विविध मानवी स्वभावांचा मार्मिक वेध, बदलत्या खेड्याचे अंतरस्पर्शी सूक्ष्म तणाव, समाजाच्या आणि व्यक्तींच्या जीवनातील विपरीत नाट्य, सखोल गहिरे कारुण्य, उत्कट काव्यात्मकता, ग्रामीण शृंगार आणि अनघड पौरुष, स्पंदनशील मनाची प्रतिमायुक्त चिंतने आणि चैतन्यपूर्ण लवचीक भाषा यांनी यादवांची कथा इथे डवरलेली आहे. कलात्मकतेचे आणि सच्च्या सामाजिकतेचे संयमी भान त्यांनी या कथांतून सहजतेने सांभाळलेले जाणवते.