मराठी साहित्यात गेल्या अर्धशतकात दलित साहित्याप्रवाहाने आपली ठळक मुद्रा अधोरेखित केली. जातीव्यवस्थेने उदध्वस्थ केलेल्या समाजजीवनाचे आक्रंदन विविध वाडमयप्रकारांतून रसरशीतपणे समोर आले. असंख्य कवी-लेखकांनी आंबेडकरी विचारप्रणालीशी बांधिलकी स्वीकारून आपली सशक्त भूमिका लेखनातून मांडली.
१९८० च्या दशकानंतर दलित स्त्रियांनी जे सर्जनशील लेखन केले, त्यात कवयीत्रींचा महत्वाचा वाटा आहे. पुरुषप्रधान व्यावस्थेसोबत संघर्ष करतानाच जात, वर्ग आणि लिंगभेदविरोधात कणखर भूमिका घेऊन या कवयीत्रिणी आपले अनोखे अनुभवविश्व शब्दबद्ध केले. या कवयित्रींच्या समग्र काव्यविश्वाचा सापेक्षी परामर्श नव्या पिढीतील अभ्यासक डॉ. जया पाटील यांनी प्रस्तुत ग्रंथात घेतला आहे. हा लक्षवेधी अभ्यास प्रथमच ग्रंथरूपाने प्रकाशित होत आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!