'’दक्षिण काशी प्रकाशा, प्रागैतिहासिक, ऐतिहासिक आणि पौराणिक”
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील इतिहास अभ्यासक डॉ. पुष्कर रमेश शास्त्री यांनी गेली काही वर्षे सखोल अभ्यास करुन लिहिलेले हे नवीन पुस्तक लवकरच अभ्यासकांना उपलब्ध होणार आहे.
या पुस्तकाच्या प्रागैतिहासिक प्रकाशा या भागात भारतीय पुरातत्तव विभागातर्फे प्रकाशा येथे झालेली उत्खनने आणि उत्खननात सापडलेल्या विविध मानवी संस्कृती आणि प्राचीन मानवी वसाहतीचे अवशेष, प्रकाशा आणि सिंधु संस्कृती यांच्यातील संबंध या विषयांवर माहिती येणार आहे. तर ऐतिहासिक प्रकाशा या भागात प्रकाशा या प्रांतावर राज्य करणार्या विविध राजवटी जसे सातवाहन, वाकाटक, यादव आणि इतर यांच्या काळात प्रकाशा आणि परिसरातील घडामोडींबद्दल माहिती येते.
या शिवाय प्रकाशायेथील प्राचीन मंदिरे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा बांधलेली मंदिरे, प्रकाशासंबंधीत असलेले अनेक शिलालेख, ताम्रपट, विविध पुराणांमधे येणारे प्रकाशा व तापी नदीचे उल्लेख, तापी माहात्म्य आणि आज प्रकाशामधे असलेली मंदिरे यांची विस्ताराने माहिती येणार आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!