हे आत्मनिवेदन असलं, तरी त्यात कुठं कणभरही आत्मसमर्थन नाही;
उलट कठोर आत्मपरीक्षण आहे.
ललित लेखन असलं, तरी भाबडं स्मरणरंजन किंवा भावुकपणा औषधालाही नाही.
विषयांच्या ओघानं काही माहिती आली, तरी त्यामागं स्वत:चं ज्ञान दाखवण्याची हौस नाही.
इतकं प्रवाही, निखळ पारदर्शक, अंतरंगाला भिडणारं आणि विचार करायला लावणारं लिखाण फार क्वचित पाहण्यात येतं.
वाचक पुस्तक वाचून खाली ठेवतो तेव्हा,
‘आपण पहिल्यापेक्षा जास्त समृद्ध झालेलो आहोत’
हे त्याला जाणवतं. पुस्तकाच्या यशाची
यापेक्षा वेगळी कुठली पावती असते?
- सुबोध जावडेकर
Thanks for subscribing!
This email has been registered!