जीवनशैलीचे इतर आजार जसे डायबेटिस, उच्च रक्तदाब व हृदयरोग ह्यांचा उद्रेक झाल्यासारखी सध्या परिस्थिती आहे. ह्या सगळ्या आजारांमध्ये आहाराला महत्त्वाचे स्थान आहे. आहार चांगला असावा हे सगळ्यांना कळते. पण तो चांगला कसा टिकवावा हे वळत नाही, याचे मार्गदर्शन म्हणजे हे पुस्तक!
लठ्ठपणा ही महत्त्वाची समस्या बनत आहे. खाण्याच्या व्यसनाचा पगडा कसा कमी करावा ह्याबद्दलची महत्त्वपूर्ण चर्चा या पुस्तकामध्ये आहे.
व्यायाम, झोप, ताण-तणाव यांचा आपल्या आहारावर व आरोग्यावर कसा परिणाम होतो, हे सुद्धा ह्या पुस्तकातून जाणून घेता येईल.
लेखकाविषयी माहिती :
डॉ. विनायक हिंगणे एमबीबीएस, डीएनबी (मेडिसिन) आहेत. बुलढाणा येथे हिंगणे हॉस्पिटलमध्ये ते फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी युनायटेड किंगडममध्येही काम केले आहे. एक दशकाहून अधिक काळ आरोग्य शिक्षणात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. डायबेटिसचा जीवनशैलीद्वारे उपचार व डायबेटिस रिव्हर्सल यांतील संशोधनात डॉ. हिंगणे यांना विशेष रस आहे. ते नियमितपणे आरोग्य शिक्षण व आरोग्य विषयक लेखन करत असतात. जीवनशैलीत बदल करण्याच्या फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याबरोबरच ते त्यांच्या पुस्तके आणि लेखांद्वारे आरोग्य जागृती निर्माण करत आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!