एका मूलभूत प्रश्नाची उकल करण्याच्या प्रेरणेतून या पुस्तकाची निर्मिती झाली. तो प्रश्न म्हणजे : ‘आजच्या काळात स्वत:चे स्थान टिकवण्यासाठी टोकाची स्पर्धा सुरू असतानादेखील कामकाजाच्या ठिकाणी मानवता प्रस्थापित करता येईल का?’ या संदर्भात कबीराच्या दोह्यांचं भाषांतर करून त्याचा बोली भाषेतील अर्थ या पुस्तकात दिला आहेच; पण त्याच्याच जोडीला आधुनिक जगातील व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसाठी या दोह्यांची उपयुक्तता अधोरेखित केली आहे. त्याद्वारे कबीराच्या विचारांचा आणि व्यावहारिक चातुर्याचा आदर्श, अनमोल खजिनाच जणू वाचकांसमोर खुला केला आहे. गोंधळाच्या किंवा पेचप्रसंगाच्या क्षणी कबीराच्या दोह्यांचा हा अभ्यास एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे दिशा दाखवेलच; पण जहाजाच्या नांगरासारखा खंबीरपणे न डगमगता उभे राहायला मदतदेखील करेल.