एमबीएची व्यावसायिक पदवी नसतानाही ज्या उद्योजकांनी उद्योग जगतात स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं, अशा 20 प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा प्रवास हे पुस्तक उलगडतं. इच्छाशक्तीने प्रेरित या उद्योजकांनी स्वतःचा स्वतंत्र मार्ग निर्माण केला आणि आपलं जीवन अर्थपूर्ण केलं. जुगाड, जुनून आणि जुबान या तीन विभागात हे पुस्तक विभागलेलं आहे. भांडी घासण्याचं काम करणाऱ्या प्रेम गणपती यांनी उभारलेला डोसा प्लाझाचा व्यवसाय असो, की खर्च भागवण्यासाठी ट्यूशन्स घेणाऱ्या हणमंत गायकवाड यांनी उभारलेला 300 कोटींचा भारत विकास ग्रुपचा व्यवसाय असो, या पुस्तकातील अशा अनेक कथा तुमच्यात प्रेरणेचं हमखास बीज पेरतात.