आत्महत्या करण्यापूर्वी कुणीतरी लिहून ठेवलेल्या पत्रामुळे हॅरी आणि एमा क्लिफ्टन, गाइल्स बॅरिंग्टन आणि लेडी व्हर्जिनिया यांच्या आयुष्यावर होतात दूरगामी परिणाम...गाइल्सच्या मनात राजकारणातून निवृत्त व्हावं की नाही याविषयी सुरू आहे द्वंद्व...त्याच्या जीवनात आलेली कारीन आहे रशियन हेर...दिवाळखोरीची वेळ आलेल्या लेडी व्हर्जिनियाने ठागलंय धनाढ्य उद्योगपती सायरस टी. ग्रॅन्टला... फार्दिंग्ज बँकेचा चीफ एक्झिक्युटिव्ह झालेल्या सेबॅस्टियनला, त्याचप्रमाणे बँकेचे चेअरमन हकीम बिशारा यांना गोत्यात आणून बँकेवर कबजा करायचं स्वप्न पाहताहेत स्लोन आणि मेलर... अॅनातोली बाबाकोव्ह यांनी रशियन सरकारविरुद्ध सडेतोडपणे लिहिलेल्या ‘अंकल ज्यो` या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर त्यांना रशियन सरकारने तुरुंगात टाकलंय...हॅरी क्लिफ्टन त्यांची तुरुंगातून मुक्तता करू पाहतोय...पण, या बाबतीत अचानकच घडतं काही कल्पनातीत...एकमेकीत गुंतलेल्या रहस्यमय कड्या आणि बदमाषांनी एकमेकांवर केलेल्या कुरघोड्यांचं रंगतदार चित्रण