अरुण फरेरांनी स्वच्छ दृष्टीने आणि तटस्थपणे तुरुंगवासातला छळ, खोटे आरोप ठेवून वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत ठेवणं, कायद्याचं राज्य या नावाखाली संपूर्ण प्रक्रियेचं बेदरकारपणे उल्लंघन करणं याची हकीगत सांगितलेली आहे. आपल्या देशातल्या हजारो-लाखो लोकांचा, स्त्रियांचा, विशेषतः ज्यांच्याकडे वकील किंवा कायदेशीर साहाय्य मिळवण्यासाठीची साधनं नसतात; त्या सर्वांचा हा अनुभव आहे. या देशाला आणखी अशा पुस्तकांची गरज आहे.