आपल्या अब्बूवर जीवापाड प्रेम करणारी पाच वर्षाची छोटी चुटकी अतिशय जिद्दी मुलगी आहे. ती जितकी अल्लड आहे त्याहून समजूतदार आणि सक्षम व्यक्तिमत्व म्हणून आपल्या भेटीला येते. लहान वयातही येणाऱ्या आव्हानांना, संकटाना भिडण्याची क्षमता तिच्यात असून निरागसपणा आणि सत्य ही तिची ताकद आहे. शांतता आणि प्रेम ह्या बुद्धाने दिलेल्या देणग्यांच्या साथीने जी तिचं जग सुंदर करण्याचा प्रयत्न करते. या पुस्तकातून नायिका म्हणून वाचकांसमोर आलेली चुटकी संघर्ष तर करतेच पण जिंकूनही दाखवते.