निरनिराळे असंख्य दगड गोळा करून एकट्यानंच आराखडा करून राजवाडा बांधणारा पोस्टमन... फ्रान्समधल्या शेतकऱ्यांचं जीवन अन् शेती... प्रसिद्ध चित्रकार व्हिन्सेन्ट गॉगचं डोळ्यांसमोर उभं केलेलं व्यक्तिचित्र... घट्ट मैत्री झालेल्या पु.भा. भावे या व्रात्य, आग्रही, आनंदी, दणकट अन् सच्च्या सहृदय साहित्यिकाचं घडविलेलं दर्शन... आणि साहसी जंगल-प्राणिसंशोधक जेन गुडाल, अफलातून वन्यजीवन लेखक जॉर्ज शेल्लर, संपादकाबरोबरच पट्टीचे शिकारी असणारे जयंतराव टिळक... सर्व क्षेत्रांमध्ये संचार करणारा अफाट रिचर्ड बर्टन... जंगल भटकंती...प्रवास...निसर्गाचा आस्वाद... —आणि बरंच काही. व्यक्ती आणि राने-वने-जंगलांचे सूक्ष्म वाचन करणारे उत्तम रेखाचित्रे काढून लेखनातून डोळ्यांसमोर एकेक दृश्य उभे करणारे सिद्धहस्त लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या लेखणीतून उतरलेली... ही अप्रतिम चित्रे आणि चरित्रे!