हजार वर्षांमागे ‘चित्रकथी’ होते. चित्र, गीत आणि वाद्य या तिन्हींच्या मेळातून, श्रोत्यांना रंगविणारी कथा सांगणारे ‘चित्रकथी`. जुन्यापिढीने हे लोक पाहिले आहेत. आत्ता मात्र काळाच्या लोंढ्यात ते वाहून गेलेत. पण पूर्णपणे काहीच नाहीसं होत नाही... ...त्याप्रमाणे चित्रकथीचं आधुनिक रूप घेऊनच जणू ‘सिनेमा’ जन्माला आला आहे. या सिनेसृष्टीतील अनुभव माडगूळकरांनी कथन केले आहेत स्वत: ‘चित्रकथी’ बनून.