अस्वस्थतेचं मखभ दाटल्यानं
कासावीस होणार्या मनांशी संवाद साधणं
मला नेहमीच अस्वस्थ करून सोडतं.
शरीर व मन यात द्वैत नसतं.
असं द्वैत मानणार्यांना माणूस समजलेला नसतो.
चिंतेच्या दडपणाखाली दोन्ही एकत्र चिरडले जातात.
मन अस्वस्थ होतं त्याला अनेक कारणे असतात. वैयक्तिक आशा, अपेक्षा, आकांक्षा
इतकंच जबाबदार असतं, आजूबाजूचं जग
काहूर माजविणारी परिस्थिती...
सामाजिक, सांस्कृतिक, धार्मि,
राजकीय, आर्थिक - विविध अंगाने
विळखा घालत येते चिंता.
विचार विवेकापासून दूर जातो
अवास्तव उत्तरे शोधीत.
जन्मावेळी रडून झाल्यावर आनंदाने जगायचं ठरविणारी माणसं आयुष्यभर चिंताग्रस्त जगत आनंद हरवून बसबात. तुमचं-माझं तसंच यापुढे होत राहू नये
या तीव्र इच्छेपोटी घेतलेला हा शोध.
Thanks for subscribing!
This email has been registered!