‘...मनाच्या मायाशक्तीविषयी मला एक लेखक म्हणून काय वाटतं सांगू? ती स्वतंत्र आहे की विधि-नियमांनी बद्ध आहे असा विचार करणंच चुकीचं आहे. मनाचं विश्लेषण मनानं करणं किंवा प्रज्ञेचं विश्लेषण प्रज्ञेनं करणं शक्यच नाही...’ या तत्त्वविचारांबरोबरच वेलदोड्याच्या उत्पन्नातल्या कमतरतेचा शोध घेण्यासाठी आलेल्या अंगाडीला सामोरं आलं ते निसर्गरम्य केसरूरमधलं सडलेलं समाज-जीवन, जातीयवादाचा अतिरेक, पराकोटीची लाचलुचपत, र्आिथक स्वार्थापायी निसर्गाचं शोषण- आणि त्यातून अपरिहार्यपणे होणारा मानवी विध्वंस! ‘कर्वालो’च्या लेखकाची वेंद्र साहित्य अकादमी विजेती कादंबरी.