आयुष्याच्या प्रवासात किशोरवय हा नाजूक टप्पा असतो. एकीकडे जाणिवा उमलत असतात; डोळ्यांत नवी स्वप्नं हसत असतात. त्याच वेळी व्यवहारी जगाचं करकरीत वास्तव समोर येतं. अशा वेळी मनाला सावरणाया, धीर देणाया, आधाराचा खंबीर हात देणाया, उमेद चेतवणाया, दुखावलेल्या मनावर हळुवार फुंकर घालणाया, रोवून ठाम उभं राहायला शिकवणाया या कथा... मनाशी अगदी हळुवार संवाद साधत निखळ मैत्रीची अनुभूती देतात. गालांवर हसू फुलवता फुलवता नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या करतात.