कवितेचा छंदांच्या अंगाने आणि छंदांचा लयीच्या अंगाने
विचार करताना गवसलेली काही आकलने
इथे लेखरूपात प्रकट झालेली आहेत.
छंद:शास्त्राच्या तात्त्विक विवेचनाच्या जोडीने
कवितेतील प्रयोगशील स्थित्यंतराचा चिकित्सक व
रसाकर्षक मागोवा येथे घेतला आहे.
छंद:शास्त्रासारखा तांत्रिक व म्हणून अवघड समजला जाणारा विषयही किती सुगम आणि रसमय होऊ शकतो,
याचा प्रत्यय देणारे ‘छंदोमीमांसा’ कवितेच्या आकलनात
नवी भर घालणारे झाले आहेे.
डॉ. शुभांगी पातुरकर यांना समीक्षेची नवी दृष्टी आहे.
‘मराठी मुक्तछंद’ आणि ‘छंद:शास्त्रीय समीक्षा’
ह्या त्यांच्या दोन अभ्यासपूर्ण ग्रंथांप्रमाणे ह्याही ग्रंथाचे
वाचक, अभ्यासक स्वागत करतील, हे नक्कीच
Thanks for subscribing!
This email has been registered!