**पूर्वनोंदणी सुरू 15 मार्च रोजी पुस्तक प्रकाशित होईल. **
२८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला खिळवून ठेवणार्या एका प्रदीर्घ राजकीय नाट्याची या शपथविधीने अखेर झाली. कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात तोवर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. या सगळ्या काळात महाराष्ट्रातील जनता नव्या मुख्यमंत्र्यांची वाट पाहत असताना, बंद दाराआड घडत-बिघडत असलेल्या राजकीय सत्तासमीकरणांची रंजक आणि प्रसंगी थक्क करणारी सफर हे पुस्तक वाचकाला घडवते.
आजवर सर्वसामान्यांपुढे न आलेल्या गोष्टींची हकिकत आतील गोटातील स्रोतांकडून आणि खासगी संवादांच्या माध्यमातून सुधीर सूर्यवंशी यांनी वाचकांपुढे आणली आहे. तसेच या सर्व घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या संदर्भात अर्थ लावण्याचा प्रयत्नदेखील केला आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!