ट्रेसी व्हिटनी या सौंदर्यवतीच्या आयुष्यात जेफ स्टीव्हन्सच्या रूपाने एक देखणा तरुण येतो आणि ते दोघे लग्नाच्या बेडीत अडकतात. जवाहिरांच्या, पुरातन मौल्यवान वस्तूंच्या चोऱ्या करण्याचे आपले जुने आयुष्य मागे ठेवून संसाराला लागतात. पण त्यांचा हा आनंद अल्पकाळच टिकतो. एक प्रचंड वावटळ त्यांच्या आयुष्यात येते आणि त्यांचा संसार उधळून लावते. त्यांच्या औटघडीच्या संसाराला कायमचे ग्रहण लागते. ट्रेसी जेफच्या आयुष्यातून नाहीशी होते. जेफ सैरभैर होतो आणि तिला शोधण्यासाठी जंग जंग पछाडतो. पण त्याला आपल्या पत्नीचा काहीही ठावठिकाणा लागत नाही.