या पुस्तकात आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी सुसंगत ठरतील, अशा युद्ध-रहस्यांची उकल केली आहे. आयुष्याच्या खेळात ‘युद्धाची तंत्रे’ प्रत्यक्ष अमलात आणून विजेता होण्यासाठी आवश्यक अशी रणनीती चाणक्य शिकवतो. व्यवसायात, कार्यक्षेत्रात, नात्यांत आणि एकूणच आयुष्यात ‘जिंकायचे’ हे आपले ध्येय असते. तथापि, या मार्गात येणार्या खाच-खळग्यांमुळे बहुतांश लोक आपल्या संपूर्ण क्षमता गाठण्यास अपयशी ठरतात. वाटेत येणारे ते खाच-खळगे पार करून नवप्रवर्तनकारी होण्यासाठी, प्रभावशाली ठरण्यासाठी आणि आपली खरी क्षमता ओळखण्यासाठी उपयोगी पडतील, अशा युक्तीच्या चार गोष्टी सांगणारे हे पुस्तक आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!