‘चाळिशी’ हा माणसाच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा का मानला जातो, हे सांगून डॉ. सुभाष दांडेकर यांनी या पुस्तकात, चाळिशीनंतरच्या आयुष्याशी अत्यंत निगडित अशा अनेक महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांवर उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे. चाळिशीनंतर होणारे शारीरिक बदल, ऋतुनिवृत्ती, हृदयविकार, कर्वÂरोग, मधुमेह अशा अनेक विषयांचे सविस्तर विवेचन करून, लेखकाने या विविध विकारांवरील उपचारांचे नेमके स्वरूप, त्यांतील तांत्रिक क्लिष्टता टाळून स्पष्ट केले आहे. वाचकांना त्यांच्या रोजच्या अनुभवविश्वातील उदाहरणे देत देत या सर्व गोष्टी लेखकाने पटवून दिल्या आहेत. हृदयविकाराच्या विविध चाचण्या, शस्त्रक्रिया, त्यांचे स्वरूप यांचे त्यांनी केलेले स्पष्टीकरण हे तर या पुस्तकाचे वैशिष्ट्य ठरावे. ज्या विषयांवर कुटुंबात, समाजात उघड बोललेही जात नाही, असा ‘चाळिशीनंतरचे कामजीवन’ हा नाजूक विषयीही त्यांनी कौशल्याने हाताळला आहे. ‘कौटुंबिक स्वास्थ्यासाठी काय करावे’, ‘वृद्धाश्रम टाळण्यासाठी काय करावे’, याविषयी मोलाची चर्चा करताना त्यांनी वृद्धाश्रमांविषयीची मौलिक माहिती दिली आहे. दत्तकविधान, मृत्युपत्र, स्वेच्छामरण, देहदान, नेत्रदान या एरवी त्यांतील तांत्रिकतेमुळे क्लिष्ट वाटणाNया विषयांची माहितीही त्यांनी वाचकांच्या आकलनाच्या कक्षेत आणून ठेवली आहे.