पेंâग शुई ही वास्तुशास्त्राशी निगडीत प्राचीन चिनी कला आहे. `पेंâग शुई` याचा शब्दश: अर्थ आहे वारा आणि पाणी. निसर्गातील संतुलन वृद्धिंगत करण्यासाठी पाणी व वारा यांसारख्या वातावरणातील शक्ती विश्वात योग्य त्या ठिकाणी ाqस्थत असल्या पाहिजेत. यासाठी पेंâग शुई आवश्यक ते ज्ञान पुरवते. मनुष्य आणि त्याचं दैव यांची सांगड परिसराशी घालणारी ती प्रणाली आहे. आपल्या आयुष्यात ऐक्य आणि सुसंगती साधण्यासाठी आपलं घर, सदनिका, दुकान यांत काय व कसे बदल करावेत याचं ती आपल्याला मार्गदर्शन करते.