मन हे आध्यात्माच्या मार्गातील अडसर मानलं जातं. पण हे खरं नाही. आत्मोद्धार करण्यासाठी मन हेच एक वाहन आहे. आणि क्रियायोग हा उत्तम मार्ग आहे. क्रियायोग हा योगांच्या सर्व शाखांत वरच्या श्रेणीचा मानला जातो. क्रियायोगानं आपल्या शरीरातील चव्रंÂ जागृत होतात, नाडींची शुद्धी होते आणि सरतेशेवटी हळूहळू आंतरीक शक्ती वाढत जाते. प्रस्तुत पुस्तकात क्रियायोगाचं हे मूलभूत तत्त्वज्ञान अतिशय सोप्या पद्धतीनं, आकृत्यांच्या सहाय्यानं समजाऊन सांगितले आहे.