विद्यार्थी मित्रांनो,
गणित विषयाची भीती बाळगण्याची आता गरज नाही. या पुस्तकाच्या मदतीने गणिताचा पाया पक्का करून तुम्ही या महत्त्वाच्या विषयात विशेष प्रावीण्य मिळवू शकाल.
अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ इच्छिणाऱ्या युवकापर्यंत सर्वांना या पुस्तकाची मदत होऊ शकेल.
ठळक वैशिष्ट्ये
• गणिते सोडविण्यासाठी उपयुक्त सूत्रे, युक्त्या आणि सोपी तंत्रे.
• सरावासाठी बुद्धीला चालना देणाऱ्या गणितांचा संग्रह.
• व्याख्या, महत्त्वाच्या संकल्पना आणि स्पष्टीकरणासहित सोडवलेली नमुना उदाहरणे यांची मांडणी सरळ सोप्या भाषेत.
• स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने योग्य त्या आकृत्यांसह सविस्तर माहिती.
• स्कॉलरशिप, महाराष्ट्र टॅलेंट सर्च, नवोदय, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा अशा सर्व परीक्षांसाठी अत्यावश्यक पायाभूत अभ्यास.
• नोकरीसाठी प्रवेशपरीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना मदतगार.
प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी उपयुक्त संदर्भ पुस्तक.