बनावट सह्या, कागदपत्रं बनवणा-या, दुस-या नावाने वावरणा-या, कुठल्याही परिस्थितीतून सहीसलामत सुटणा-या त्या काळातल्या अनेक धाडसी गुन्हेगारांपैकी एक. त्याच्या गुन्हेगारीच्या काळात त्यानं वैमानिकाचा गणवेश घालून पॅन अॅमचं जेट विमान सहवैमानिकाच्या जागेवर बसून बेधडक चालवलं. एका रुग्णालयात बनावट रेसिडेण्ट डॉक्टर म्हणून काम केलं. जवळ परवाना नसताना वकिली केली, कॉलेजातून समाजशास्त्राचा प्राध्यापक बनला आणि चेक्समध्ये बदल करून पंचवीस लाख डॉलर्स मिळवले. आणि हे सगळं तो एकवीस वर्षांचा होण्याच्या आत! कल्पितापेक्षा अद्भुत असलेली सत्यकथा! फसवणुकीतला बादशहा, तोतयेगिरीमधला तज्ज्ञ, बनावट कागदपत्रं, चेक्स बनविण्यात हातखंडा असलेल्या या माणसाचं अद्भुत चरित्र!