एका रात्री उशिरा खेळाच्या मैदानाजवळ चमकणारे दिवे दोन शिक्षिकांचं लक्ष वेधून घेतात. सगळी शाळा गाढ झोपेत आहे आणि त्या दोघी दिव्यांचा तपास सुरू करतात. लॅक्रॉस खेळाच्या काठ्यांजवळ त्याची पावले अडखळतात आणि आढळतो खेळाच्या एका अप्रिय शिक्षिकेचा मृतदेह. छातीवर बंदूक ठेवून तिला ठार मारण्यात आलेलं असतं. बंदुकीची गोळी हृदयाच्या आरपार गेलेली असते.
जेव्हा ‘मांजर’ दुसरं सावज मारतं, तेव्हा शाळेचं वातावरण भयग्रस्त होतं. ज्युलिया अपडिक हिला मात्र या प्रकरणाची जरा जास्तच माहिती असते. किंबहुना तिला हे नक्की माहीत असतं की हर्क्युल पायरोची मदत मिळाली नाही तर ‘मांजरा’ची पुढची शिकार तीच असणार आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!