करिअर' हा आजच्या काळात कळीचा मुद्दा झाला आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या डॉ. श्रीराम गीत यांनी लिहिलेल्या 'करिअर मार्गदर्शक' या नव्या पुस्तकाने कित्येक जणांना दिलासा मिळणार आहे. मळलेल्या किंवा नव्या वाटेनं जाऊ पाहणाऱ्या नवतरुणांनाच फक्त नव्हे तर त्यांच्या पालकांनाही या पुस्तकाचा मोठा आधार वाटेल. कुठली दिशा निवडावी याबद्दलची मनातला संभ्रम दूर करून स्वत:चा कल ओळखायला मदत करत हे पुस्तक करिअरसाठी विविध दिशांची माहिती करून देतंच, शिवाय उमेद वाढवण्याची सुरेख कामगिरीही करतं.