Canvas By achyut Godbole
अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख या लेखकद्वयीने 'कॅनव्हास' या कलेविषयक ग्रंथात पाश्चात्त्य कलेचा धावता तरीही गुंतवून ठेवणारा रोचक इतिहास सांगितला आहे. लेखकांची अभिरुचीसंपन्न भाषा आणि सुगम भाषाशैली यामुळे सामान्यांपासून ते असामान्यांपर्यत सर्वांनाच हा इतिहास वाचताना तो मनःचक्षुनी पाहण्याचाही अनुभव ठरावा. माणसातला कलावंत आणि कलावंतातला माणूस यांचे परस्पर नाते स्पष्ट करताना संबंधित कलावंत कोणत्या ध्येयांनी आणि स्वप्नांनी भारावून गेले होते आणि त्या स्थितीत कोणते आत्मबळ, दृष्टियोग व कर्मभोग त्यांच्या वाट्याला आले याचेही अप्रत्यक्षरीत्या मांडलेले आलेख आपल्या जाणिवेत रुतणारे ठरतील यात शंका नाही.
Thanks for subscribing!
This email has been registered!