सेहमत... एक महाविद्यालयीन काश्मिरी युवती! तिच्या मरणासन्न वडिलांची अंतिम इच्छा समजली, त्या वेळी त्यांच्या उत्कट इच्छेला आणि देशभक्तीला शरण जाण्याखेरीज ती फारसं काहीच करू शकत नव्हती. त्यांच्या चांगल्या परिचयातील पाकिस्तानी जनरलच्या मुलाबरोबर तिनं लग्न केलं. भारतीय गुप्तचर यंत्रणेला नियमितपणे माहिती कळवत राहणं, ही तिची मोहीम होती. तिच्या प्रिय देशाचं नौदल नष्ट करू शकणारी गोपनीय माहिती तिच्या हाती लागेपर्यंत तिनं हे काम कमालीच्या धैर्यानं आणि धाडसानं पार पाडलं.
खऱ्याखुऱ्या घटनांनी प्रेरित असलेली कॉलिंग सेहमत ही हेरगिरीवर आधारित रोमांचक रहस्यकथा आहे. जी प्रसिद्धीच्या झोतात कधीच आली नाही, अशा एका अनामिक नायिकेची ही अजरामर कहाणी आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!