फुल फोकसमध्ये तो बाप्या उभा आहे समोर चबुतऱ्यावर. काय म्हणून ?” लोकमान्य टिळक ते, भडव्या. ” तेच ते !शहरात शिरू शकतात ते ? लालूच्या गावाहून आलेल्या मालीशवाल्यांना माहिताय ते कोण आहेत, त्यांना असं गावाबाहेर का काढलंय ते ? “मला असं शहराबाहेर उभं राह्यचं नाहीय. इटस् टाईम आय एन्टर द गेम बॉईज ! मी राडा करणारेय, भेंच्योद. शहर वाचवू शकतील अशा सगळ्याच बाप्यांना हिजड्यांनी शहराबाहेर काढलंय. चबुतऱ्यावर चढवलंय. आता कोणीही कुठेही घुसावं आणि राडा करावा. सातपुतेला मारावं, गरोदर बायकांना मारावं, पोरांना, म्हाताऱ्यांना उडवावं. जाळावं. बॉम्बच्या माळा लावाव्यात. मान वर करून कोणी बघतसुद्धा नाही . चार लाख सदतीस हजार नऊशे ही चिल्लर झाली भेंच्योद . भुकेल्या कुत्र्यांना भुलवणारं खरकटं , आता खरा माल कमवायचाय मला !