ही एक उत्कंठावर्धक भयकथा आहे. गढदुर्गमधले चकख रिसोर्ट म्हणजे साक्षात मृत्यूचा तांडवच... हे रिसोर्ट दगड-विटांनी न बनता माणसांच्या मांस आणि रक्ताच्या चिखलानं बनलेलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणारं नाही. हे रिसोर्ट म्हणजे महाकाळ नावाच्या सैतानाचं साम्राज्य आहे... ज्याचा वास आहे एका बुजगावण्यात... जो आजही माणसाच्या प्राणांचा भुकेला आहे. अशा काळ बनून उभ्या असलेल्या रिसोर्टमध्ये सात-आठ तरुणांचा एक ग्रुप सहलीसाठी म्हणून येतो आणि बारा वर्षं बंद पडलेलं ते लंबक घड्याळ अचानक सुरू होतं. मांस आणि रक्त यासाठी भुकेलं असेललं ते सैतानरूपी बुजगावणं एक-एक करून आपला सावज हेरून शिकार करू लागतं. मग सुरू होतो मृत्यूचा खेळ... यात विजय कुणाचा होतो? ही तरुणाई सैतानाचा सामना कशा प्रकारे करते? मृत्यूचा तांडव असाच सुरू राहतो की बुजगावणरूपी सैतानाचा अंत होतो? हे जाणूण घेताना वाचक निश्चितच एका जागी खिळून राहतो.
Thanks for subscribing!
This email has been registered!