काही नावातच संघर्षमय यशाची प्रेरक बीजे पेरलेली असतात. सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर या नामावलीप्रमाणेच मेरी कोम हे नाव उच्चारताच नवचेतना संचारते. आपल्या क्षेत्रात आपणही काहीतरी करून दाखविण्याची उर्मी जागृत होते. ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगच्या पदार्पणातच पदक मिळविण्याची किमया करणारी... जबरदस्त इच्छाशक्ती, कष्ट आणि हर्दम्य आत्मविश्वास याच्या जोरावर आपली क्रीडा कारकीर्द समृद्ध करणारी... स्वबळावर आपली कारकीर्द घडविणारी..... एम.सी. मेरी कोम म्हणजेच मंगते चुंभेईजंग मेरी कोम. एक ऑलिम्पिक पदक काय चमत्कार घडवते, हे मेरीच्या यशाने जगाने पाहिले आहे. या पदकासाठी एका तपापेक्षा अधिक काळ तिने दिलेली अग्निपरीक्षा नवे बळ देणारी आहे. हे सर्व काही या पुस्तकात देण्याचा प्रा. संजय दुधाणे यांचा प्रयास यशस्वी झाला आहे..
Thanks for subscribing!
This email has been registered!