आभासी चलनामागचं खरं- खोटं
भरपूर पैसे मिळवणं आणि त्याची गुंतवणूक करणं याविषयी सर्वसामान्यांना कमालीचं आकर्षण असतं. आपल्या देशात सध्या बिटकॉइनबद्दल असंच आकर्षण एकीकडे आहे व दुसरीकडे साशंकताही आहे. बिटकॉइन म्हणजे नेमकं काय? त्याचे फायदे किती आणि कुठले ? तोटे कुठल्या प्रकारचे ? हे सारं जाणून घेऊन बिटकॉइनचा उपयोग आपल्याला चांगल्या तऱ्हेनं करून घेता येईल का, या संदर्भात दिशादिग्दर्शन करणारं पुस्तक म्हणजे
' बिटकॉइन: आभासी चलनाची अद्भुत दुनिया.' अतुल कहाते यांच्यासारख्या तंत्रज्ञान व अार्थिक विश्व या दोन्हींमधील तज्ज्ञानं केलेलं हे लेखन अत्यंत अभ्यासपूर्ण व मनोरंजकही आहे.
संकटात सापडलेल्या देशांमध्ये चलन म्हणून बिटकॉइनचा वापर कसा केला जातो, याबद्दलची सविस्तर माहिती लेखकानं दिली आहे. बिटकॉइनची संकल्पना व ते कधी सुरू झालं याचप्रमाणे त्याच्या भविष्याबाबतही कहातेंनी या पुस्तकात मार्मिक भाष्य केलं आहे. फसवणूक टाळून आभासी चलनाचा उपयोग करून घेण्याची मानसिकता वाढण्याच्या सध्याच्या काळात हे पुस्तक चांगल्या प्रकारे तयारी करून घेणारं ठरू शकतं.
Thanks for subscribing!
This email has been registered!