बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी ‘मायक्रोसॉफ्ट’ या जगविख्यात सॉफ्टवेअर कंपनीची निर्मिती केली. एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचे धाडस त्यांनी दाखवले, त्यासाठी आवश्यक गुण अंगीकारून आणि प्रचंड मेहनत करून त्यांनी यश मिळवले. केवळ पैसा कमविणे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता समाजोपयोगी कार्य करून त्यांनी मानवतावाद जोपासला. त्यांच्या या अभूतपूर्व प्रवासाची कहाणी या पुस्तकात आहे, जी प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल.
* जिद्द, चिकाटी, एकाग्रतेचा अभूतपूर्व प्रवास... * 35 रुपये ते 1 करोड 20 लाख! * 30 व्या वर्षी बिलेनियर * आदर्श पती आणि पिताही! * मानवतावादी बिल गेट्स * व्यावसायिकतेचे धडे
Thanks for subscribing!
This email has been registered!