२०१९ साली अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अभिजीत बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी एस्थर डफ्लो यांना
सन्मानित करण्यात आले.
'वैश्विक गरीबी समूळ नष्ट करण्याच्या प्रयोगावर केलेल्या संशोधनासाठी' हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला.
अभिजीत बॅनर्जी यांनी १९८३ मध्ये जे एन यू मधून एमए पर्यंतचे शिक्षण पूर्ण करुन त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केली. भारतातल्या विकलांग मुलांना चांगलं शिक्षण कसं देता येईल, यासाठी अभिजीत बॅनर्जी यांनी एक संशोधन पेपर लिहिला होता. त्याचा तब्बल ५० लाख मुलांना फायदा झाला आहे.
त्यांचे 'Good Economics for Hard Times' हे इंग्रजी पुस्तक जगभर गाजले व चर्चिल्या गेले आहे.