सर्वेक्षण मालिकेचे मुख्य संपादक : गणेश देवी
भाषिक सर्वेक्षणाचा स्तुत्य उपक्रम ‘महाराष्ट्रातील भाषा’ ह्या खंडाद्वारे साकार होत आहे. महाराष्ट्रातील पंथ, जाती, धर्म, संप्रदाय यांची विविधता आहे. यांमुळे मराठी भाषेची प्रादेशिक रूपे साहजिकच अनेक आहेत. अभिजन, बहुजन, भटके-विमुक्त आदिवासी, दलित अशा विविध समाजांच्या विविध भाषिक रूपांनी महाराष्ट्र ध्वनित होत असतो.
हा भाषिक सर्वेक्षणाचा ग्रंथ आहे, तसाच तो मानव समूहांचाही अभ्यास आहे. हे सर्वेक्षण आजचे आहे. मूळ परंपरा आणि तिच्यात वेळोवेळी होत असलेले बदल व त्यातून संक्रमित झालेली आजच्या पिढीची बोली किंवा रूपे येथे आढळतात. ह्या दृष्टीने हा मोलाचा सांस्कृतिक ऐवज आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!