डॉ. के. रं. शिरवाडकर हे पाश्चिमात्य साहित्याचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. त्यांनी मोठ्या लेखकांची जीवनचरित्रे, समीक्षा, समीक्षा-तत्त्वज्ञान आणि व्यवहार, तत्त्वज्ञान, धर्मजिज्ञासा, विज्ञान आणि अध्यात्म यासंबंधी पुस्तके लिहिली आहेत. प्रस्तुत पुस्तकात डॉ. शिरवाडकर यांनी प्राचीन भारतीय संस्कृतीच्या संकल्पनेची चर्चा करतानाच धर्मचिकित्साही केली आहे. विज्ञान आणि धर्म यांची तुलना करून त्यांचे स्वरूप स्पष्ट केले आहे. एकूणच धर्म, अध्यात्म आणि विज्ञान यांच्या परस्परसंबंधाची चिकित्सा अतिशय अलिप्त वृत्तीने केली आहे. प्राचीन भारतातील प्रमुख विचारप्रवाहांची मांडणीही विस्ताराने केली आहे. ज्ञानजिज्ञासू रसिक, अभ्यासकांना हे पुस्तक विचारप्रवृत्त करण्यास कारणीभूत ठरेल. यांतून अनेकांनी पुढे अधिक चर्चा करावी व त्यातून आणखी ज्ञानविस्तार व्हावा. हे घडेल याची खात्री आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!