वाघ आणि सिंह दोन्हींचे वास्तव्य असलेला भारत हा जगातील एकमेव देश असल्याचे तुम्हाला माहितीये? माऊंट एव्हरेस्टची नेमकी उंची कोणी शोधून काढली?
या आणि अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात नक्की सापडतील. या पुस्तकात तुम्ही कधी कल्पनादेखील केली नसेल अशा कित्येक गोष्टी सापडतील; जसे की, आपली नमस्कार करण्याची प्रथा ही मुळात हडप्पन संस्कृतीमधील आहे, तसेच भारतात एकाक्ष दैत्यांचा सुळसुळाट असल्याची अनेक काळ लोकांची समजूत होती. आणि पुस्तकाच्या अखेरीपर्यंत अगदी अलगदपणे आपल्याला भारताच्या – भूगोलाच्या इतिहासाची परिपूर्ण माहिती होऊन जाते.
Thanks for subscribing!
This email has been registered!