स्वत:च्या आईनेच कॉन्स्टन्सला ‘तू कुरूप आहेस, कुरूप’ असं म्हटल्याने तिला अनेक यातना झाल्या होत्या. तिचं शारीरिक, तसंच मानसिक शोषण झालं होतं. पण तिची स्वप्नं आणि तिच्या आशाआकांक्षा यांची झेप मोठी होती. तिची जिद्द चिवट व बळकट होती. कॉन्स्टन्सने कायद्याचा अभ्यास करण्याकरिता विद्यापीठामध्ये प्रवेश घेतल्यावर तिच्या पुढे प्रश्न होता तो, खर्चाचा; तो कसा भागवायचा याचा? पण अर्धवेळ छोट्या-मोठ्या नोक-या करून तिने हा प्रश्न सोडवला. त्यानंतर तिला एका चांगल्या, नामांकित कायदेविषयक फर्ममध्ये काम करण्याची संधी चालून आली, पण कॉन्स्टन्सची ही अडथळ्यांची शर्यत सहजसहजी संपली नाही.... केवळ बाह्य सौंदर्याकडे न पाहता; त्यापलीकडे पाहण्याचा संदेश देणारे, अंतर्मुख करणारे कथन.