लतिफा अलीची ही सत्य कहाणी आहे. एखाद्या पाश्चात्त्य मुलीप्रमाणे लतिफा अलीचे तिच्या कुटुंबीयांकडून संगोपन केले गेले. ऐन तारुण्यात मात्र परंपरा आणि रुढीच्या जोखडामुळे तिला इराकच्या उत्तर भागातील र्कुिदस्तानमध्ये वडलांच्या घरी कैद करून ठेवण्यात आले. त्यामुळे कोणत्याही दूतावासाशी ती संपर्क साधू शकत नव्हती. एक मुस्लीम स्त्री म्हणून वडलांच्या कैदेत असताना ना तिला मदत, ना कोणी मित्र, ना घराबाहेर पडण्याची मुभा होती. तिच्याभोवती जसजसे दहशतीचे थैमान वाढत गेले तसे इराकी संस्कृती आणि रुढी-परंपरांविरुद्ध जणू युद्धच पुकारले. परंतु कैद, छळ, याबरोबरच तिचे अस्तित्वच नाकारले गेल्यामुळे तिचे सुटकेचे प्रयत्न फोल ठरू लागले आणि मृत्यूचे पाश तिच्याभोवती आवळले जाऊ लागले. त्याही परिस्थितीत तिने युनोच्या लोकांशी जवळीक साधली आणि अखेर ती देशाच्या सीमेपर्यंत पोहोचली. मात्र लतिफाजवळ एक धोकादायक गुपित होते, ते उघड झाले असते तर मृत्यू अटळ होता.