डब्लिनमधील हार्मन सुधारणागृह हा युरोपमधील सर्वात भयानक तुरुंग... डॉ. फ्रँक रयान यांच्याकडं बंदिजनांच्या आरोग्याची जबाबदारी होती. फार जोखमीचे काम होतं. ह्याआधीच्या डॉक्टरचा खून झाला होता. डॉ. रयान याने मात्र ही जबाबदारी आव्हान म्हणून स्वीकारली होती.एका पहाटे रयानला फोन करून तुरुंगात बोलविण्यात येते. सुखशय्येतील प्रेयसीचा निरोप घेऊन डॉ. रयान तडक निघतो, पण तो सापडतो एका सापळ्यात! शुद्धीवर आल्यावर त्याला वाटतं की, तो हॉस्पिस्पटलमध्ये आहे पण काहीतरी चुकतंय. परिचारिका खोलीचे दार कुलूप लावून का बंद करतेय? लिसा का भेटायला येत नाही? रयान तुरुंगात तर नाही?परस्परविरोधी आणि गोंधळात टाकणाऱ्या पुराव्यामुळे डॉ. रयान चक्रावून जातो. त्याचा माग काढताना डॉ. रयान तुरुंगातील संवेदनाशील `जे` कक्षापर्यंत पोहोचतो. तिथे एका गूढ व्यक्तीचे वास्तव्य आहे....