बेस्ट ऑफ फॅमिली डॉक्टर
भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा घटक आहे फॅमिली डॉक्टर . जसे आयुर्वेद हा वेदांचा उपवेद आहे, तसे फॅमिली डॉक्टर म्हणजे कुटुंबाचे उपकुटुंब होय. फॅमिली डॉक्टर हा जणू कुटुंबाचाच एक सदस्य असतो. "शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्' असे म्हटले जाते. शरीराची संपूर्ण माहिती, शरीराला वाढवणे, पुष्ट करणे, निरोगी ठेवणे, रोग होऊ नये म्हणून प्रतिकार करणे, रोग झाला तर तो बरा करणे, अपघात झाल्यास शरीराला पूर्वावस्थेत आणणे वगैरे गोष्टी प्रत्येकाला ज्ञात असतीलच असे नाही. हे सर्व सांभाळणारी एक विशिष्ट व्यक्ती म्हणजे वैद्य वा डॉक्टर असते. उपचारांची योजना करताना सर्व अंगाचा विचार करून व्यक्तीवर कुठल्या वेळेला कोणत्या प्रकारचे उपचार देण्याची गरज आहे हा निर्णय घेणे फार गरजेचे असते, तसा निर्णय घेण्यासाठी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना, फॅमिली डॉक्टर ही व्यक्ती आणि फॅमिली डॉक्टर हा ग्रंथ उपयोगी पडू शकतो.
"Best of फॅमिली डॉक्टर ' या संग्रहात प्रातिनिधिक रोग घेऊन त्यांची माहिती, त्यावरचे इलाज समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक घरात कायम फॅमिली डॉक्टर सारखा सल्ला देणारे ठरू शकेल.
Thanks for subscribing!
This email has been registered!