जगात अशा काही गोष्टी घडत असतात, की त्या का घडतात याची शास्त्रशुद्ध कारणं सापडत नाहीत. बर्म्युडा ट्रँगलविषयी हेच म्हणता येईल अटलांटिक महासागराच्या पश्चिमेस त्याच महासागराचा एक त्रिकोणी भाग आहे. हा भाग बर्म्युडा, फ्लोरिडा, बहामाच्या पुढे पोर्टोरिको यांच्या दरम्यान आहे. या भागात आतापर्यंत १००पेक्षाही अधिक बोटी आणि विमाने नाहीशी झाली आहेत.
हे अपघात होऊनही पाण्यात बुडून झालेल्या मृत्यूचे अद्याप पुरावे सापडलेले नाहीत. हे सर्व असे गायब होतात, की जणू हवेत विरून जातात. असे का होते, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न लेखक चार्ल्स बर्लीझ यांनी केला आहे. विजय देवधर यांनी याचा केलेला अनुवाद वेधक आहे. वाचकांची उत्कंठा वाढवत नेणारी ही आगळी कथा.