गजाआडच्या गोष्टी
पुस्तकाविषयी -
कधी थरकाप उडवणारं, कधी थक्क करणारं, कधी मनात संतापाची तीव्र लाट उसळणारं तर कधी करुणाभाव निर्माण करणारं ... 'गजाआडच्या गोष्टी ' हे पुस्तक म्हणजे वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या कथांची मालिका! 'व्ही.आय.पी.' व्यक्तीच कसं असतं, याची एक झलक आपल्याला यातून मिळते. भारतातल्या वलयांकित कैद्यांचं गजाआडचं आयुष्य नेमकं कसं असतं, याची एक झलक आपल्याला यातून मिळते. भारतातल्या वलयांकित कैद्यांचं गजाआडचं आयुष्य नेमकं कसं असतं ? तुरुंगात त्यांना खरंच कष्टप्रद आयुष्य कंठावं लागतं की पैशाच्या, सत्तेच्या जोरावर पंचतारांकित सुखं उपभोगता येतात ? नेमकं काय घडतं त्या अंधाऱ्या कोठडीत? भारतातल्या अनेक कुप्रसिद्ध तुरुंगांची हवा खाऊन आलेल्या काही प्रसिद्ध व्यक्तींच्या समोरासमोर घेतलेल्या मुलाखतींमधून उलगडत जाणाऱ्या या 'गजाआडच्या गोष्टी' पहिल्यांदाच वाचकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!