अरुण साधू
हे नाव मराठी माणसाला चांगलं परिचित आहे. पत्रकार आणि कादंबरीकार म्हणून... ‘बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्या इमारती’ हा कथासंग्रह आहे. पण त्यांचा वाङ्मयीन स्वभाव वृत्तपत्रीय वृत्तांतकथनाचा आणि निवेदनप्रधान कादंबरीचा आहे. असे प्रातिभ लेखन वाचकाला चटकन आकर्षून घेते. महानगरीतील धनदांडगे आणि त्यांच्या हवेल्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या कंगाल झोपडपट्टया... या दोन टोकांवर वावरणार्या विश्वातील अंतरक्रिया हा लेखकाचा आस्थेचा विषय आहे. त्यांची सहानुभुती अर्थातच पानठेलेवाले, मोलकरणी, यांच्याकडे आहे. अरुण साधू यांच्या सामाजिक भूमिकेशी हे त्यांचे वाङ्मयीन वर्तन सुसंगतच आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!