काळ्या लोकरीच्या गुंड्यासारखा छोटासा झिपरू आपल्या आईबाबा आणि भावाबरोबर जंगलात मजेत राहत होता. अचानक दुष्ट माणसांनी त्याच्या आईबाबांना संपवत त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची रवानगी झाली सर्कशीत. तिथे त्याला थोडं प्रेमही मिळालं, पान जंगलची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो संधीची वाट पाहत होता...