वाढवूया आर्थिक भान
भारतात संस्थात्मक बँकिंग कधीपासून सुरू झालं, माहीत आहे? इ. स. १८०६ मध्ये 'बँक ऑफ बंगाल' या दृष्टीनं ऐतिहासिक म्हणायला हवी.
भारतात काही बँका स्वतःचं चलन नोटांच्या स्वरूपात वितरित करीत होत्या , हे ठाऊक आहे का तुम्हाला ? नंतर ब्रिटीश सरकारने त्यांचा हा अधिकार काढून घेऊन सरकारी चलन वापरायला परवानगी दिली , ही माहितीही अनेकांना ठाऊक नाही. अशा रम्य व मौलिक इतिहासाच्या ठळक नोंदींसह आजचं आपलं जगणं सुकर आणि समृद्ध करण्यासाठी ' बँकिंग आणि विमा' या पुस्तकाचा उपयोग आपल्याला करून घेता येईल. विनायक कुळकर्णी यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून ग्राहकांना अर्थसाक्षर व्हायला मोठीच मदत होते. पैशांची नियोजनपूर्वक गुंतवणूक केली तर आपला धनवृक्ष बहरू शकतो. गुंतवणुकीला विश्वसनीय पर्याय म्हणून लोक आजही बँका व विम्यासारख्या क्षेत्राला प्राधान्य देतात. मात्र बँका व विविध विमा संस्था कोणकोणत्या सुविधा पुरवतात , याची संपूर्ण माहिती गुंतवणुकदारांना नसते. त्यामुळे कित्येकदा चांगल्या योजना असूनही त्यांचा फायदा गुंतवणूकदारांना करून घेता येत नाही. बँकिंग क्षेत्रही आता केवळ ठेवी व कर्जांपुरतेच मर्यादित राहिलेलं नाही. हे लक्षात घेऊन ग्राहकांना अर्थसाक्षर बनवणारे गुंतवणूक समुपदेशक विनायक कुळकर्णी यांनी लिहिलेलं ' बँकिंग आणि विमा' हे पुस्तक समृद्ध होण्यासाठी अवश्य वाचावं. पुनःपुन्हा वाचण्यासाठी आपल्या संग्रही ठेवावं असंच आहे
Thanks for subscribing!
This email has been registered!