डोळ्यांत अंजन घालणाऱ्या या निबंधांमधून अरुंधती रॉय अधिकारशाही वृद्धिंगत होत असलेल्या या जगात स्वातंत्र्याचा अर्थ चाचपून पाहण्यासाठी आपल्याला उद्युक्त करतात. या निबंधांमध्ये सार्वजनिक तसेच खासगी भाषा आणि या अस्वस्थ कालखंडात फिक्शनसह इतर पर्यायी कल्पनांची नेमकी कोणती भूमिका असावी, याविषयीच्या चिंतनाचा समावेश आहे. रॉय म्हणतात, की ही जागतिक साथ म्हणजे दोन जगांच्या दरम्यान असलेले एक प्रवेशद्वार आहे. या साथीमुळे आरोग्याची आणि इतरही अपरिमित हानी झालेली असली, तरी तिने मनुष्यजातीला एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. नव्या जगाची कल्पना करण्याचे आपल्या सगळ्यांना मिळालेले हे निमंत्रण आहे.