भारताच्या इतिहासाचे फाळणीपूर्व आणि फाळणीनंतर असे दोन भाग होतात. फाळणीनंतरच्या स्वतंत्र भारताची सुरवात हिंसाचाराने झाली. याच हिंसाचाराने देशात आता पाळेमुळे रुजविली आहेत. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम भारतातील कोणत्या न कोणत्या भागात अशांतता असतेच. संकटे- मग ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित- सतत येत असतात.
भारतातील अनेक राज्यांना भेट देऊन, तेथील अनुभव अविनाश धर्माधिकारी यांनी ‘अस्वस्थ दशकाची डायरी’त लिहिले आहेत. ध्येयवादाने केलेल्या दहा वर्षांच्या वाटचाल देशातील परिस्थितीवर प्रकाश टाकते. यातून युवकांच्या मनाचा कल समजतो. धर्माधिकारी यांनी घेतलेला भारताचा शोध मन अस्वस्थ करतो.
Thanks for subscribing!
This email has been registered!