अस्वस्थ मी, अशांत मी’ या नव्या संग्रहातल्या कथांतून तिच्या जाणिवांच्या विस्तारलेल्या कक्षांचे दर्शन घडते आणि हृदयाच्या अंतरहृदयातून येणारी अस्वस्थता आणि अशांतता अत्यंत प्रगल्भपणे व्यक्त होते. अविनाश सप्रे यांनी म्हटल्याप्रमाणे, स्त्रीत्वातून सुरुवात करून माणूसपणाचा शोध घेणाऱ्या या कथा आहेत आणि त्यामागे आत्मप्रामाण्य, आत्मभान, आत्मशोध, आत्मप्रत्यय, आत्मविश्वास आणि आत्मबळ देणाऱ्या मूल्यांचं भान कार्यरत आहे.