अस्मिता फुरसुंगीकर, भारतीय लष्करातील कर्नलच्या मुलीचे अपहरण झाले. शोध घेण्याची जबाबदारी संजय पाटील या पोलीस अधिका-यांवर सोपविण्यात आली. मालाड नदी, जहागीरदार अहवाल, मुशी कट्यार, मृत्युंजय यज्ञ, घारापुरी बेट, इराडी देवी, अलिबाग किल्ल्यातील तळघर यातील गूढरहस्य, मुंबईपासून अलिबागपर्यंतच्या शोध मोहिमेत संजयची गाठ पडली आहे अघोर पंथातील सिद्धीपुरुष सर्पराजमहाराजांशी, त्याला तोंड देण्यासाठी मदत घ्यावी लागली ती अध्यात्म जगातील श्री गुरुमणी यांची आणि सुरू झाला जीवघेणा संघर्ष. सर्पराजमहाराज कोण? श्री गुरुमणी कोण? आणि या सर्व प्रकरणाची सुरुवात करणारे माणगावकर वकील कोण? रक्तरंजित थरारक प्रकरणात संजय अस्मिताची सुटका करण्यात यशस्वी होतो का? रोमहर्षक, नाट्यमय, वेगवान साहित्यकृती.